महात्मा गांधी नरेगा मदत केंद्र
महात्मा गांधी नरेगा मदत केंद्र ही महाराष्ट्रातील नागरिकांना पुरविण्यात आलेली एकात्मिक सुविधा आहे ज्या व्दारे मगांराग्रारोहयोची ते माहिती मिळवू शकतात आणि मगांराग्रारोहयोच्या अंमलबजावणीशी संबंधित त्यांच्या तक्रारी सादर करू शकतात.
- टोल-फ्री टेलिफोन 1800-233-2005, कार्यालयीन वेळेत सर्व कामकाजाच्या दिवशी, जेथे नागरिक मगांराग्रारोहयोबाबत माहिती मिळवू शकतात आणि त्यांची तक्रार नोंदवू शकतात.
- 24 x 7 उपलब्ध तक्रार निवारण वेब पोर्टल https://egssupport.maharashtra.gov.in/#/login/citizen महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत प्रदान केलेल्या नियम आणि हक्कांशी संबंधित कोणत्याही विषयावर सक्षम अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्यासाठी राज्यातील सर्व कार्यक्रम अधिकारी आणि सहकार्यक्रम अधिकारी यांना प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी हे एकच पोर्टल आहे. राज्यातील सर्व कार्यक्रम अधिकारी आणि सहकार्यक्रम अधिकारी यांना प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी हे एकच पोर्टल आहे.
- 24 x 7 कार्यरत तक्रार निवारण अँड्रॉइड मोबाइल अँप्लिकेशन , सक्षम अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्यासाठी गुगल प्ले स्टोअर https://play.google.com/store/apps/details?id=com.egs.citizen डाउनलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध आहे.
मदत केंद्रावर तक्रारदार नागरिकांकडून तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या नातेवाईकांकडून तक्रार स्वीकारली जाते.
तक्रार निवारण पोर्टल/मोबाईल ऍप्लिकेशन सक्षम तक्रार निवारण कार्यालयाद्वारे प्रत्येक तक्रारीचे कालबद्ध पध्दतीने निराकरण करते आणि प्रकरणात वेळेवर हस्तक्षेप आणि निराकरण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यापर्येंत तक्रार पोहोचवणारी यंत्रणा म्हणुन कार्यरत असते.
या पोर्टल/मोबाईलवर दाखल केलेल्या तक्रारीची सदयस्थिती तक्रारीच्या नोंदणीच्या वेळी प्रदान केलेल्या नोंदणी आयडीद्वारे पाहिली जाऊ शकते. हया पोर्टल/मोबाईलद्वारे सक्षम तक्रार निवारण कार्यालयाच्या कार्यवाहीवर नागरिक समाधानी नसल्यास त्यांना अपील करण्याची सुविधा देखील प्रदान करते. तक्रार बंद केल्यानंतरदेखील तक्रारदाराचे समाधान न झाल्यास, तो/ती या पोर्टलवरील पुढील वरिष्ठ सक्षम तक्रार निवारण कार्यालयाकडे आपली तक्रार पुन्हा दाखल करण्यासाठी अपील/याचीका करू शकतो. तक्रार कर्त्याद्वारे तक्रार नोंदणी क्रमांकासह पुन्हा प्रकरण सुरू करण्याच्या विनंतीची स्थिती देखील तो पोर्टलवर पाहु शकतो.