महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (2005) (मनरेगा 2005 कायदा)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, 2005 (मगांराग्रारोहयो) 7 सप्टेंबर 2005 रोजी अधिसूचित करण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तयार केलेल्या योजनेला राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र असे म्हणतात.
आज्ञापत्र
ज्या कुटुंबातील प्रौढ सदस्य अकुशल अंगमेहनीतीचे काम करण्यासाठी स्वेच्छेने तयार होतात अशा प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी, हे मनरेगाचे प्रमुख उददेश आहे. उद्दिष्टे
उद्दिष्टे
मगांराग्रारोहयो ची मुख्य उद्दिष्टे :
- मागणीनुसार ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान 100 दिवस अकुशल हाताला काम उपलब्ध करून देणे, परिणामी विहित गुणवत्तापूर्ण आणि टिकाऊ उत्पादक मत्ता निर्माण करणे.
- गरिबांच्या उपजीविकेच्या साधनांचा आधार मजबूत करणे.
- सक्रियपणे सामाजिक समावेश सुनिश्चित करणे.
- पंचायती राज संस्थांचे बळकटीकरण
ध्येय
मगांराग्रारोहयो ची उद्दिष्टे आहेत:
- मजुरीच्या रोजगाराच्या संधींची हमी देऊन ग्रामीण भारतातील सर्वात असुरक्षित लोकांसाठी सामाजिक संरक्षण.
- टिकाऊ मालमत्तेची निर्मिती करण्यासाठी मजुरीच्या रोजगाराच्या संधी निर्माण करून ग्रामीण गरिबांच्या उपजीविकेची सुरक्षा वाढवणे
- ग्रामीण भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे पुनरुज्जीवन करणे.
- एक टिकाऊ आणि उत्पादक ग्रामीण मत्ता तयार करणे.
मनरेगा कायदा, 2005 येथे वाचा.
महाराष्ट्रात रोजगार हमी योजना (महाराष्ट्रात रोहयो )
सध्या राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी कायदा, 1977 (6 ऑगस्ट 2014 पर्यंत सुधारित) लागू आहे आणि या कायद्याअंतर्गत खालील दोन योजना चालू आहेत.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना -महाराष्ट्र (मगांराग्रारोहयो) या योजनेंतर्गत, केंद्र सरकार प्रति कुटुंब 100 दिवसांच्या रोजगाराची हमी देते आणि मजुरी खर्चासाठी प्रति कुटुंब 100 दिवस निधी देते. महाराष्ट्र सरकार प्रत्येक कुटुंबाच्या 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांच्या मजुरीच्या खर्चाचा आर्थिक भार उचलते.
- महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम,1977 च्या कलम (12) (ई) नुसार, वैयक्तिक लाभ योजना अनुदान म्हणून प्रतिपूर्ती आधारावर लागू केल्या जातात.
याशिवाय राज्य शासनाचा निधी पुढील कामांसाठी वापरला जातो
- राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत प्रगतीपथावर असलेली कुशल कामे पूर्ण करण्यासाठी.
- राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत संपादित केलेल्या जमिनीच्या भरपाईसाठी.
महाराष्ट्र रोजगार हमी कायदा, 1977 (6 ऑगस्ट 2014 पर्यंत सुधारित केल्याप्रमाणे) येथे वाचा.