क्षेत्र भेटी
28 डिसेंबर रोह्यो मंत्री जी में श्री भरत गोगावले जी का खोमरपाड़ा गांव में दौरा व मनरेगा योजना के लाभार्थियो से चर्चा गाँव में रोजगार के अवसर मिलने से खोमरपाड़ में लोगों का पलायन रुकेगा विक्रमगड तालुका के खोमरपाड़ा निवासी परिवारों ने कृषि और कृषि व्यवसाय शुरू किया है और महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी योजना के माध्यम से पलायन को रोका है और गांव के परिवार ने पिछले वित्तीय वर्ष में अच्छी आय अर्जित की है। खोमरपाड़ा गांव में मनरेगा योजना के तहत विभिन्न कार्यों का लाभ लेकर परिवारों ने जो समृद्धि हासिल की वह सराहनीय और आदर्श है। मंत्री रोजगार गारंटी योजना श्री भरत गोगावले ने खोमरपाड़ा गांव में दौरा करते हुए व्यक्त की। खोमरपाड़ा में मनरेगा योजना के तहत हुए विभिन्न कार्यों का निरीक्षण कर कृषि, मत्स्य पालन, सब्जी की खेती, रबी फसल की खेती, गंदूल की खेती, बकरी पालन एवं अन्य कृषि पूरक गतिविधियों का निरीक्षण किया। मंत्रियों ने चर्चा की। नंदादीप समृद्ध गांव खोमरपाड़ा के विकास को प्रदेश के हर जिले में दोहराए जाने का प्रयास सरकार करेगी। साथ ही रोह्यो विभाग गांवों को समृद्ध बनाने व प्रदेश व राष्ट्र को समृद्ध बनाने के लिए प्रयासरत रहेगा। मंत्री महोदय ने इस बार जाहिर किया। मनरेगा मिशन के महानिदेशक श्री नन्दकुमार जी, रोजगार गारंटी विभाग के संबंधित वरिष्ठ अधिकारी एवं जिलाधिकारी एवं स्थानीय जनप्रतिनिधि उपस्थित रहे।
5 जून. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नागपूर येथील सावनेर तालुक्यातील ग्राम पंचायत खुबाळा येथील सार्वजनिक वृक्षलागवड कामाला मा. आयुक्त (मनरेगा) श्री. अजय गुल्हाने, भा.प्र.से यांनी भेट दिली. मनरेगा योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या पडीक जमिनीवर सुंदर अशी वृंदावन तयार झाल्यामुळे मा. आयुक्तांनी कामाची प्रशंसा केली. तसेच, पर्यावरण दिनाच्या औचित्याने त्याठिकाणी वृक्षारोपण केले.
9 मार्च. रोहयो विभागाचे मा. प्रधान सचिव श्री. दिनेश वाघमारे भा.प्र.से. यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका येथील खानिवली व खुपरी गावात पूर्ण झालेल्या तसेच चालू असलेल्या कामांना यांनी भेट दिली. खानिवली गाव अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याची पाहणी केली व खुपरी गावातील नाला सरळीकरण काम बघितले तसेच येथे कामावर उपस्थित मजुरांशी चर्चा केली. याप्रसंगी महात्मा गांधी नरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध कामांची माहिती देऊन त्यांनी या कामांचा लाभा घ्यावा यासाठी त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सचिवांसोबत सहायक संचालक श्री. विजयकुमार कालवले व मनरेगाचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी हजर होते.
1st सप्टेंबर मा. आयुक्त (मनरेगा) श्री. अजय गुल्हाने, भा. प्र. से. यांनी नांदेड जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत वृक्षलागवड, जनावरांचा गोठा, रोपवाटिका, पेवर ब्लॉक इ. कामांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच, मेरी माठी मेरा देश उपक्रमाअंतर्गत उभारण्यात आलेल्या शिलाफलकांची पाहणी केली. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार (रोहयो), वनपरिक्षेत्र अधिकारी (सा.व.), APO, तांत्रिक सहाय्यक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
दि. १२.०८.२०२३ अमृत महोत्सवी मौजा पाळा, ता. मोर्शी येथील कामाच्या ठिकाणी निर्मिती शीलाफलकाची मा. आयुक्त (मनरेगा) श्री. अजय गुल्हाने, भा.प्र.से यांनी पाहणी केली. तसेच मनरेगा अंतर्गत मौजा बेनोडा, ता.वरूड येथील अंगणवाडीच्या कामाचीची पाहणी केली.
13 jan आयुक्त यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा ता. येथील सारसी व पालवाडी ग्रामपंचायतींमध्ये मनरेगा अंतर्गत पूर्ण झालेल्या सिंचन विहीरी,गुरांचे गोठे,वृक्ष लागवड व शाळेची सौरक्षण भिंत अशा विविध कामाची पाहणी केली तसेच लाभार्थ्यांसोबत व कामावर उपस्थित मजुरांसोबत चर्चा केली
विविध कार्यक्रम
26 नवंबर राज्यात संविधान दिन विविध अमृत सरोवर स्थळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संविधान दिनानिमित्त राज्यातील विविध अमृत सरोवर स्थळी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूलभूत तत्वांवर प्रकाश टाकणारी भाषणे करण्यात आली. या प्रसंगी सर्व वयोगटातील स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, अमृत सरोवरच्या वापरकर्ता गट व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमामुळे नागरीकांना भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या मूल्यांचे पालन करण्याची वचनबद्धता अधिक दृढ करण्याची प्रेरणा मिळाली.
वातावरणातील बदल आणि पर्यावरणाचा सतत होत असलेला ऱ्हास, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड अत्यंत आवश्यक आहे. त्याअनुषंगाने "एक पेड माँ के नाम" या मोहिमेंतर्गत यांच्या मनरेगाचे आयुक्त मा. श्री. अजय गुल्हाने, भा.प्र.से यांच्या मार्गदर्शनात दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालूका येथील दाभा आगरगाव ग्रामपंचायतीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वृक्षारोपण कार्यक्रमात शासकीय अधिकारी, स्वयं-सहायता गटांचे सदस्य, स्थानिक रहिवासी सहभागी झाले होते. मा. आयुक्त यांनी उपस्थितांना वृक्षांचे महत्व व पर्यावरणाचे संवर्धन करणे आपले कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले.
5 जून. जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने मा. आयुक्त (मनरेगा) श्री. अजय गुल्हाने, भा.प्र.से. यांनी नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुका येथील अमृत सरोवर - माजी मालगुजारी तलाव येथे वृक्षारोपण केले. उपस्थितांना पर्यावरण संरक्षण करण्यासाठी व वातावरणीय बदलात पर्यावरणाचे महत्वाच्या योगदायाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच, स्वच्छ व हरित गाव सप्ताह या मोहिमेचा शुभारंभ केला व मोहिमेअंतर्गत 5 जून ते 12 जून 2024 या कालावधीत राबवयाच्या विविध उपक्रमाबाबत माहिती क्षेत्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. प्रसंगी मा. उपायुक्त (मनरेगा) श्री. सुबोध मोहरील, जिल्हा नोडल अधिकारी अमृत सरोवर, गट विकास अधिकारी, मनरेगा आयुक्तालयातील अधिकारी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने दि. २१ जून, २०२४ रोजी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुका येथील चारगाव तलाव अमृत सरोवराच्या परिसरात मा. आयुक्त (मनरेगा) श्री. अजय गुल्हाने यांच्या प्रमुख उपस्थितीत मनरेगा आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारीवृंद यांच्याद्वारे योग दिवस साजरा करण्यात आला. याप्रंसगी मनरेगाचे उपायुक्त श्री. सुबोध मोहरील, सहाय्यक संचालक श्री. प्रशांत ढाबरे, विस्तार अधिकारी श्रीमती सुनिता भोले, लेखा अधिकारी श्रीमती अश्विनी पात्रिकर, नायब तहसीलदार श्रीमती शिला भुसारी तसेच, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद नागपूर, पंचायत समिती काटोल येथील अधिकारी व कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनीही योगाभ्यासात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. योग प्रशिक्षक म्हणून पंचायत समिती परशिवणी येथील कृषी अधिकारी श्री. सी. एस. देशमुख यांनी योगाभ्यासात सहभागी झालेल्यांकडून विविध योगासनांचा सराव करवून घेतला.
2nd October
'स्वच्छता ही सेवा' अभियाना अंतर्गत मनरेगा आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह केले महाश्रमदान आयुक्तालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ, श्रमदानातून परिसर चकाचक
स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत मा. आयुक्त श्री. अजय गुल्हाने यांनी आयुक्तालयातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी १५ सप्टेंबर ते २ आक्टोबर या कालावधीत देशभर स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात येतो. त्याअनुषंगाने मनरेगा आयुक्तालयाच्या वतीने दि. १ ऑक्टोबर, २०२३ रोजी सकाळी १० वा. कार्यालयाच्या परिसरात महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान स्वच्छतेची शपथ घेतल्यानंतर लगेच प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य देत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करुन कार्यालयाभोवतील परिसर चकाचक केला.
9th ऑगस्ट "मेरी माटी मेरा देश" या उपक्रमांतर्गत हातात दिवे घेऊन 'पंचप्रण शपथ' घेण्याचा कार्यक्रम मा. प्रधान सचिव (रोहयो) श्री. दिनेश वाघमारे, भा.प्र.से. यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि. ९ ऑगस्ट २०२३ रोजी मनरेगा आयुक्तालय, नागपूर येथे आयोजित करण्यात आला. मा. आयुक्त (मनरेगा) श्री. अजय गुल्हाने, भा.प्र.से. यांच्यासह आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे पंचप्रण शपथ घेण्यात आली.
5th जुलै श्री. शंतनू गोयल, भा.प्र.से. यांची बदली सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई येथे झाल्याने मनरेगा आयुक्त पदाचा पदभार श्री. अजय गुल्हाने, भा.प्र.से. यांनी आज स्वीकारले. सहा. आयुक्त श्री. अनिल किटे व सहा. संचालक श्री. प्रशांत ढाबरे यांनी पुष्पगुच्छ देऊन आयुक्तांचे स्वागत केले.
21st जून आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्ताने मनरेगा आयुक्त श्री. रविंद्र ठाकरे यांनी आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारीवृंद यांच्यासह नागपूर येथील माहूरझरी अमृत सरोवर येथे योगा दिन साजरा केला. याप्रसंगी गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले.
3rd मार्च महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 'झेप अभिमानाची स्वाभिमानाने जगण्याची' या कार्यक्रमाचे आयोजन दि. ३ मार्च, २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे करण्यात आले. यानिमित्ताने मनरेगा अंतर्गत योजनेची क्षेत्रियस्तरावर अमलबजावणी करणाऱ्या कर्तव्यतत्पर आणि महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान राज्याचे मा. राज्यपाल श्री. रमेश बैस व मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी मा. मंत्री रोहयो व फलोत्पादन श्री. सांदिपान भूमरे, मा. आमदार श्री. आशिष जैस्वाल, मा. आ. श्री. महेंद्र दळवी, रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. नंद कुमार, मनरेगा आयुक्त श्री. शांतनू गोयल आणि राज्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
10 jan राज्याचा रोजगार हमी योजना विभाग आणि टाटा मोटर्स यांच्यामध्ये पालघर जिल्ह्यात १० लाख वृक्ष लागवडीकरिता रोहयो आणि फलोत्पादन मंत्री मा. श्री. Sandipan Bhumare यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
23 Aug Atal Bhujal
15 Aug स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त नागपूर येथे आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मनरेगा आयुक्तालय मार्फत तयार करण्यात आलेल्या "महाराष्ट्रातील अमृत सरोवर" या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी नागपूर जिल्हा परिषदचे अध्यक्षा श्रीमती रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, भा.प्र.से, जिल्हाधिकारी श्रीमती आर विमला, भा.प्र.से, मनरेगा आयुक्त श्री. शांतनु गोयल, भा.प्र.से. आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
7 July रोहयो विभागाचे अ.मु.स. मा. श्री. नंदकुमार सरांनी आज नागपूर येथे मनरेगा आयुक्तालयातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. तसेच योजनेच्या उत्तमरीत्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी आयुक्त मा. श्री शान्तनु गोयल उपस्थित होते.
12 March #मनरेगा आयुक्तालयाच्या नूतनीकृत कार्यालयाचे उदघाटन रोहयो मंत्री मा. श्री.संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली व नागपूरचे पालकमंत्री मा. डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आ.मा. श्री.चंद्रिकापुरे, अ.मु.स. मा.नंदकुमार व आयुक्त मा. शान्तनु गोयल उपस्थित होते. विदर्भात नेहमीच मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची संख्या जास्त असते येथील नागरिकांना नरेगा आयुक्तालयाशी समन्वय साधने सोईस्कर व्हावे या उद्देशाने आयुक्तालय नागपूरात कार्यान्वित करण्यात आले असे प्रतिपादन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. या प्रसंगी जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने महात्मा गांधी नरेगा अंतर्गत काम करणाऱ्या महिला ग्राम रोजगार सेवक व मजूर मेट यांना मा. मंत्री महोदयांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मा. श्रीमती. आर विमला प्रामुख्याने उपस्थित होते.
28 Aug To aware the NREGA beneficiaries about their rights under Mahatma Gandhi #NREGA. Act’s Entitlements Awareness Campaign was conducted at Dewapur GP and Kotgul Grampanchayat in Gadchiroli District under
06 Aug महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील दहिवद ग्राम पंचायतीच्या माध्यमातून #AzadiKaAmritMahotsav #INDIA@75 अंतर्गत एका मिनिटात हजारो वृक्षरोपांची लागवड. या वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात मनरेगाच्या मजुरांसह, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी आणि विविध प्रशाकीय अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. दहिवद ग्रामपंचतीमार्फत १० हजार वृक्षरोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट असून या वृक्षलागवडीमुळे दहीवद हे जंगलनिर्मितीचा अनोखा पॅटर्न राज्यात उभा राहणार आहे.
23 September औरंगाबाद विभागातील उपायुक्त (रोहयो) यांनी आज VC द्वारे विभागातील सर्व उपजिल्हाधिकारी (रोहयो), उपमुख्य कार्य.अधि. तसेच कृषी, वने आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत #नरेगा_योजनातुन_गाव_समृद्ध करणे या विषयावर चर्चा केली.
21 July संपूर्ण देशात ग्रामीण भागातील नागरिकांना महात्मा गांधी नरेगा कायद्याअंतर्गत रोजगाराची हमी देण्यात येते. देशाला #मनरेगा कायदा देणारे 'रोजगार हमी योजनेचे' जनक वि. स. पागे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
24 April मनरेगा आयुक्त श्री. ए. एस. आर. नायक,भाप्रसे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हानिहाय #मनरेगा कामांचा आढावा घेतला. तसेच, लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील गरजू लोकांसाठी महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत पुरेशे कामे उपलब्ध ठेवण्याची सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिली.
18 Feb मा. मंत्री, रोजगार हमी व फलोत्पादन श्री. संदिपानजी भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली दि. १८.०२.२०२० रोजी औरंगाबाद विभागातील क्षेत्रीयस्तरावरील अधिकारी यांची आढावा बैठक, जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद, येथे घेण्यात आली. सदर बैठकीस औरंगाबाद विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
10 July राज्यातील लाखो वारकरी आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे जमा होत असतात.
26 Jan Under the guidance of Hon. Secretary (EGS & Water Conservation) shri.@DawaleEknath sir a beautiful combine tableau of Employment Guarantee Scheme and Soil & Water Conservation Dept. is participated in the Republic Day Parade 2019 at Shivaji Park, Dadar, Mumbai.
मीडिया